Daund bypass line will be completed by March 2019. It's leveling work is already started. One platform of lenght 600 m will be build on this chord line. This line connects Pune - Solapur line with Daund - Manmad line. It will save around 45 mins to 1 hr journey time for non stopping trains such as Hawrah Duranto, KSK etc.
Detailed News in Marathi -
पुणे-मनमाड मार्गावरील रेल्वेगाड्यांसाठी दौंडमध्ये बाह्यळणमार्ग तयार करण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा पाऊण ते एक तासाचा वेळ वाचणार आहे. या कामासाठी मध्य रेल्वेच्या पुणे...
more... विभागाकडून सुमारे ३० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, सहा महिन्यांत ते पूर्ण होईल.
पुणे-मनमाड लोहमार्गावरील सर्व रेल्वे गाड्यांना दौंड स्थानकावर सध्या अर्धा ते एक तासापर्यंत थांबावे लागत आहे. त्याविरोधात प्रवाशांनी वेळोवेळी आवाजही उठविला आहे. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने २०१६ मध्ये ३० कोटी रुपये खर्च करून दौंडला जाणे टाळण्यासाठी बाह्यवळण मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला. त्यानुसार, भूसंपादनासाठी राज्य सरकारकडे सुमारे १२ कोटी ५० लाख रुपयेही जमा केले. मात्र, भूसंपादनास उशीर झाल्यामुळे हे काम आता सुमारे तीन महिन्यांनी लांबणीवर पडले आहे. आता सप्टेंबरअखेर कामाला सुरवात होणार असून, पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या बाह्यवळणासाठी १९ शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे, त्यातील १४ शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करून रेल्वेला देण्यात आले आहे. बाकी पाच शेतकऱ्यांची जमीन ताब्यात आल्यानंतर कामाला सुरवात होईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. हा बाह्यवळण मार्ग सुमारे १ हजार १०० मीटरचे असेल. त्याठिकाणी एक प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहे.
बाह्यवळण मार्ग तयार झाल्यानंतर गाड्यांना दौंड जंक्शनवर लागणारा वेळ वाचणार आहे. इंजिन बदलण्याची गरज राहणार नाही. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
- आर. के. शर्मा, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक, सोलापूर
रेल्वेचा प्रवास म्हणजे अंतर कमी आणि वेळ जास्त असा झालेला आहे. त्यामुळे प्रशासनाने हे काम लवकर पूर्ण करावे. या मार्गावरील सिग्नल यंत्रणा अद्ययावत करावी म्हणजे गाड्या जलद धावू शकतील.
- हर्षा शहा, रेल्वे प्रवासी ग्रुप
बाह्यवळण मार्ग
३० कोटी खर्च
११०० मीटर लांबी
सहाशे मीटर लांबीचा एक प्लाटफॉर्म
२४ गाड्यांचा वेळ एक तासाने वाचणार
मार्च २०१९ मध्ये काम पूर्ण होणार