New highspeed railway corridor Mumbai-Kolkata
नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर होणार; भारतीय रेल्वे मंत्रालय आणि स्पेन रेल्वेचा प्रकल्प
औरंगाबाद : स्पेनच्या मदतीने देशात नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. यातूनच बुलेट ट्रेनच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन हायस्पीड रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. दोन टप्प्यांत देशातील प्रमुख मार्गांवर हायस्पीड रेल्वे धावणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई ते नागपूर या नवीन मार्गाचे नियोजन असल्याची माहिती अभ्यास दौऱ्यावर आलेल्या स्पेनच्या जे. जे.ओटेटिओ यांनी गुरुवारी (ता.10) पत्रकारांना दिली. हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर मुंबई-नागपूर हे अंतर सुमारे चार तासांत कापले जाईल.
राज्याच्या...
more... राजधानी व उपराजधानीला जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याच प्रकल्पाच्या अभ्यास दौऱ्यासाठी गुरुवारी स्पेनच्या चार सदस्यीय समितीने मध्यवर्ती बसस्थानक आणि रेल्वेस्थानकाला भेट दिली. या मार्गाविषयी रेल्वे अधिकारी आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची प्रमुख वैशिष्ट्ये
•मुंबई-नागपूर पहिला टप्पा
•मुंबई-कोलकाता दुसरा टप्पा
•तीन हजार किलोमीटरचे अंतर जोडले जाणार
•दीड वर्ष चालणार सर्वेक्षण
•प्रकल्पासाठी आठ वर्षांचा कालावधी अपेक्षित
•नवीन सर्व्हिस स्टेशन वाढणार आहे.
•स्वतंत्र डबल लाईनसह विविध सुविधा उपलब्ध करणार
•डोंगर घाटातून न जाता पर्यायी मार्गाचा होतोय अभ्यास
•रेल्वेस्थानक व बसस्थानक राहणार एकमेकांजवळ
•सध्याचा रेल्वेमार्ग कायम ठेवून नवीन मार्ग उभारण्याचा मानस
•भारतीय रेल्वे विकास निगम लिमेटडअंतर्गत प्रोजेक्ट