देशभरातील वाहतूक व्यवस्थेचे जाळे भक्कम करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्चाच्या घोषणा करणाऱ्या केंद्र सरकारला कल्याण-अहमदनगर या प्रस्तावित मार्गाचा सपशेल विसर पडला आहे. चार वर्षांपूर्वी या मार्गाचे सर्वेक्षण करून ६ हजार २६४ रुपये खर्चाचा प्रस्ताव रेल्वेच्या इंजिनिअरिंग विभागाने रेल्वे मंत्रालयाला पाठवला होता.