पुणे- शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असताना त्याला विरोध करणे योग्य नाही. सध्याचा प्रस्ताव महापालिकेतील सर्वच राजकीय पक्षांनी एकमताने मंजूर केला होता. मात्र, आता त्याला विरोध करणे म्हणजे मेट्रो नको, अशी भूमिका असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसने व्यक्त केले, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अभ्यास करून मत व्यक्त करणार असल्याचे सांगितले; तर मेट्रो तातडीने करा, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. शहरातील काही भागांत भुयारी, तर काही मार्गांवर रस्त्यावरून धावणारी मेट्रो करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने बहुमताने मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविला होता. त्या वेळी सभागृहात मेट्रोच्या बाजूने 87 मते, तर विरोधात एकच मत होते.
REF esakal Pune Date 5th Nov 2014